वेंगुर्ला ता०८-:* आरवली-सागरतीर्थ, टांक येथील श्रीदेव काशिकल्याणी ब्राह्मण वंशेश मंदिराचा जीर्णोद्धार व शिखर कलश स्थापना सोहळा ९ ते १३ मे या कालावधीत विविध कार्यक्रमांनी संपन्न होत आहे.
यानिमित्त ९ मे रोजी गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदिश्राद्ध, आचार्यवरण, पार्थीव गणपती पूजन, प्राकारशुद्धी गणेशयाग, संप्रेक्षण विधान, दुपारी १ वा. आरती व महानैवेद्य, सायं. ५ वा. भजन, रात्रौ ८ वा. आरोलकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग, दि. १० रोजी स्थलशुद्ध, शांतीपाठ, आवाहित देवता पूजन, श्री देवता संप्रोक्षण विधी, ग्रहयजन, वास्तूयजन, दुपारी १ वा. आरती व महानैवेद्य, सायं. ७ वा. सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवरांचा सत्कार, रात्रौ ९ वा. भजन, दि.११ मे रोजी दुपारी १२.४५ मिनिटांनी श्री दत्त विठ्ठल वारकरी ह.भ.प.हरेकृष्ण भगवान पोळजी यांच्या हस्ते शिखर कलश स्थापना, बलिदान, पूर्णाहूती, आरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, हळदीकुंकू समारंभ, सायं. ५ वा. श्रीसत्यनारायण महापूजा, रात्रौ ७ वा. भजन, रात्रौ १० वा. मामा मोचेमाडकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग, दि.१२ मे रोजी अभिषेक, आरती, तिर्थप्रसाद, दुपारी १ वा. फलाहार, सायं. ४ वा. फुगडी, सायं.६ भजन, सायं.७.३० चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग, दि.१३ मे अभिषेक, आरती, तिर्थप्रसाद, दुपारी १ वा. महानैवेद्य, सायं.५ वा. गणपती विसर्जन होणार आहे. तरी या कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन श्री देव काशिकल्याणी ब्राह्मण वंशेश मंदिर जिर्णोद्धार ट्रस्ट, बागकरवाडी यांनी केले आहे.
