शाहू, फुले, आंबेडकर व शिवाजी महाराज यांचा एकत्रित जयंती सोहळा

वेंगुर्ला ता.०८-:* फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच वेंगुर्ला तर्फे मंगळवार दि.१० मे रोजी सकाळी १०.३० वाजता साई मंगल कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती कार्यक्रम सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला आमदार दीपक केसरकर हे उपस्थित राहणार असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘शेती व शेतकरी याबाबतचे विचार‘ यावर मार्गदर्शन करणार आहेत. तरी शिवाजी, फुले, शाहू, आंबेडकर विचार धारेच्या सर्वांनी तसेच शेतकरी व नागरिकांनी या सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचचे वेंगुर्ला अध्यक्ष जयप्रकाश चमणकर व सचिव के.जी.गावडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page