दुचाकी चालक जखमी, दुचाकीचे मोठे नुकसान;दुचाकी चालकावर गुन्हा दाखल
वेंगुर्ले ता.०८-:* वेंगुर्ले आगाराची सावंतवाडी तुळसमार्गे रस्त्यावरून वेंगुर्लेला येणाऱ्या बसला आज रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारा तुळसघाटी गोरे एस.टी.स्टॉप नजीकच्या वळणावर वेंगुर्लेतून तुळसला जाणाऱ्या दुचाकीने एस.टी.बस ला मधोमध ठोकरले. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी हलविण्याात आले आहे.
या अपघात प्रकरणी पाल-कदमवाडी येथील दुचाकी चालक नाराण शंकर पालकर (47) याचेवर गुन्हा दाखल झाला आहे. तुळस घाटी येथे सावंतवाडी वरून तुळस मार्गे वेंगुर्ले आगारात येणाऱया वेंगुर्ले आगाराची एम.एच.14- बी.टी.-1783 या एस.टी. बसला वेंगुर्ले वरून तुळस येथे असलेल्या मेस्ट्रो कंपनीची के.अs.22-ई.एक्स.-9044 या दुचाकीस्वाराने एस.टी. बसला समोरून मधोमध धडक दिली. हा अपघात सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तुळस घाटी येथील गोरे बसस्टॉप नजीक घडला. यात पाल-कदमवाडी येथील दुचाकीस्वार नारायण शंकर पालकर (47) हि व्यक्ती जख्मी झाली. तसेच दुचाकीचेहि मोठे नुकसान झाले. तर एस.टी. बसच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. सदरचा अपघात घडताच तात्काळ एस.टी. वरील चालक निखिल एकनाथ भाटकर यांनी दुचाकीस्वार नारायण पालकर यांना प्राथमिक आरोग्य केंद्र तुळस येथे दाखल केले. यावेळी नारायण पालकर याbच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी ओरोस येथे हलवण्यात आले.
या अघाताची खबर एस.टी. वरील चालक निखिल एकनाथ भाटकर यांनी वेंगुर्ले पोलीसांना देताच तात्काळ वेंगुर्लेचे पालीस उपनिरीक्षक विनायक केसरकर, हेड काँन्स्टेबल भगवान चव्हाण, कॉन्स्टेबल सुरज रेडकर याbनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी दुचाकी चालक नारायण पालकर याचेवर भा.द.वि. कलम 279 व 337 तसेच मोटर व्हेईकल अँक्ट 1988 चे कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा अधिक तपास पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकाँन्स्टेबल रंजीता चौहान करीत आहेत.
