जान्हवी श्रीनाथ ठरली कोकण सुंदरी

रिया मसुरकर लिटल चॅम्स;मळेवाड ग्राम सांस्कृतिक महोत्सव २०२२ थाटामाटात संपन्न

सावंतवाडी ता.०८-:* मळेवाड येथील ग्राम सांस्कृतिक महोत्सव 2022 मधील सौंदर्य स्पर्धेत कोकण सुंदरी जान्हवी श्रीनाथ, तर रिया मसुरकर लिटल चॅम्प्स ची मानकरी ठरली. मळेवाड जकातनाका येथे ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे व युवा मित्र मंडळ कोंडुरे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम सांस्कृतिक महोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात युवतींची कोकण सुंदरी 2022,तर लहान मुलांसाठी लिटल चॅम्प 2022 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही स्पर्धा सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवत उत्तरोत्तर रंगत गेल्या. आकर्षक विद्युत रोषणाई व स्पर्धकांना व प्रेक्षकांना ताल धरायला लावणारे संगीत यामुळे ही स्पर्धा आणखीनच रंगत दार होत गेली.पहिल्या फेरीत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी वेशभूषा करून स्पर्धकांनी रसिकांची मने जिंकली.

लिटल चॅम्प्स 2022 मधील टॅलेंट फेरीत परीक्षकांच्या प्रश्नांना मुलांनी आपल्या भाषेत उत्तर देत सामोरे गेले. तर कोकण सुंदरी 2022 मधील युवतींना परीक्षकांनी दिलेल्या प्रश्नावर पाच ओळीत आपले मत लिहून मांडत असताना आपल्या भावना, आपले विचार प्रकट करत सर्व स्पर्धक या फेरीला सामोरे गेले. अखेर कोकण सुंदरी 2022 चा मान रत्नागिरी येथील जान्हवी श्रीनाथ हिने पटकावत आपल्या शिरपेचात मानाचा मुकुट रोवला.

तर लिटल चॅम्प 2022 चा मुळेवाड येथील रिया मसुरकर हीने मान पटकावला. कोकण सुंदरी 2022 चा निकाल पुढीलप्रमाणे प्रथम जान्हवी श्रीनाथ द्वितीय पूजा कर्ले तृतीय मैथिली राणे उत्कृष्ट वेशभूषा तन्वी गोसावी, बेस्ट स्माईल संयुक्त शेट्ये, बेस्ट हेअर स्टाईल हिमानी गायकर, बेस्ट कॅटलॉक श्रीनाथ ओडियन्स चॉईस पूजा मुळीक. लिटल चॅम्प्स 2022 चा निकाल पुढीलप्रमाणे प्रथम रिया मसुरकर द्वितीया वैदेही नाईक तृतीय प्रियंका कामत बेस्ट बेस्ट स्माईल वैदेही नाईक, उत्कृष्ट वेशभूषा मानसी राऊत, बेस्ट हेअर स्टाईल वैदेही नाईक, बेस्ट कॅट वॉक रिया मसुरकर, ऑडियन्स चॉईस संचित गोवेकर. कोकण सुंदरी 2022 या स्पर्धेत एकूण 17 स्पर्धकांनी भाग घेतला होता लिटल चॅम्प्स 2022 या स्पर्धेत बारा स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचे परीक्षण पत्रकार प्रवीण मांजरेकर, साक्षी वंजारी, नारायण परब व मधुरा काणे यांनी केले. तर सूत्रसंचालन हेमंत मराठे यांनी केले. फोटो ओळ — पहील्या छायाचित्रात कोकण सुंदरी मधील विजेते स्पर्धक,तर दुसऱ्या छायाचित्रात लिट्ल चॅम्पस् मधील विजेते स्पर्धक. सोबत परीक्षक व मान्यवर.

You cannot copy content of this page