वेंगुर्ला ता.०६-:* मुंबई-विक्रोळी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सिंधुदुर्ग पॉवरलिफ्टींग असोसिएशनच्या पॉवरलिफ्टरनी धडाकेबाज कामगिरी बजावत सायली घारे, श्रृती राणे, स्वप्नाली कदम, संजय साटम यांनी सुवर्ण पदके, श्रावणी साटम, ऋषिकेश तेली, कैलास पवार यांनी रौप्य, तर चेतना दुधवडकर, प्रभुद्धराज नाईक व विनोद चौगुले यांनी कास्य पदके पटकविली. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील संजय साटम यांना स्ट्राँग मॅन ऑफ दि महाराष्ट्र आणि सायली घारे यांनी स्ट्राँग वुमन ऑफ महाराष्ट्र तर सृष्टी राणे हिने फर्स्ट रनर ऑफ महाराष्ट्र हे किताब पटकाविले.
महाराष्ट्र पॉवरलिफ्टींग असोसिएशनच्या मान्यतेने व दि मुंबई शहर पॉवरलिफ्टींग असोसिएशन आणि उत्कर्ष क्रिडा मंडळ संचलित उत्कर्ष व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने विक्रोळी (पूर्व) येथे राज्यस्तरीय महिला व पुरूष ज्युनियर व ऑल मास्टर्स इक्युप्ड पॉवरलिफ्टींग वुमन अँण्ड स्ट्राँग मॅन ऑफ महाराष्ट्र २०२२ या स्पर्धेचे आयोजन केल होते. उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक मुकुंद कारखानीस यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत राज्यातील २३२ खेळाडूंमध्ये सिधुदुर्गातील लक्ष्मण दळवी, यश तेली, जयेश तेली, ऋतिक भामणे, भूषण कुबडे, साहिल मोर्ये, नित्यानंद वेंगुर्लेकर आदी पॉवरलिफ्टरनी सहभाग घेतला होता.
विजेत्यांना ठाण्याच्या आय.एफ.एस.अधिकारी सरोज गवस यांच्या हस्ते गौरविण्यात आले. विजेत्या व सहभागी खेळाडूंचे महाराष्ट्र पॉवरलिफ्टींगचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर दरेकर, अध्यक्ष पुष्काराज कोले, जनरल सेक्रेटरी सैदल सोंड, जॉईंट सेक्रेटरी राजेश घाटवळ, सिद्धार्थ चुरी, सिधुदुर्ग पॉवरलिफ्टींग असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी दिलीप नार्वेकर, उपाध्यक्ष राजू बेग, दिलीप गिरप, कल्पना सावंत, डॉ.गणेश मर्गज, प्रविण नाईक, प्रविण गुरव, मंगेश घोगळ, प्रशिक्षक संजय साटम, गणेश वायंगणकर, वैभव मुद्राळे, सिद्धेध नाईक, दिपक राऊळ, विनायक नवार, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गौरीश धोंड, फर्स्ट लेडी प्रतिमा धोंड, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश साळगावकर, स्पोर्ट्स सेक्रेटरी महेश अनगोळकर यांनी अभिनंदन केले.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या बाँम्ब निकामी शोध पथकातील पोलीस निरीक्षक संजय पुंडलिक साटम यांची १२ ते १५ मे २०२२ ला दुर्ग छत्तीसगढ येथे आयोजित नॅशनल पॉवरलिफ्टींग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांनी महाराष्ट्र राज्यस्तरीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत मानाचा स्ट्राँग मॅन ऑफ महाराष्ट्र किताब मिळवून सिंधुदुर्ग जिल्हा व पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
पॉवरलिफ्टींग खेळासाठी पुरुष व महिला खेळाडूंना प्रशिक्षण देवून, या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत उत्तम कामगिरी करणा-या जामसंडे येथील गणेश वायंगणकर जीम व कासार्डे येथील वैभव मुद्राळे जीम यांना रोटरी ३१७० तर्फे दहा हजार रुपयांची प्रोत्साहनपर देणगी असिस्टंट गव्हर्नर राजेश घाटवळ यांनी सुपूर्द केली.
