भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे करणार पालिकेला मदत
सावंतवाडी ता.०५-:* येथील मोती तलावात गाळ काढण्याची मोहीम येत्या दोन दिवसात सुरू होणार आहे यासाठी सावंतवाडीचे भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी देखील मद्त म्हणून स्वतः दोन डंपर दिले असून पालिका प्रशासनाकडून श्री गोंदावळे यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.
याबत अधिक माहिती अशी की, लोकसहभागातून तलावातील गाळ काढण्याच्या मोहिमेला येत्या दोन दिवसांत सुरुवात होणार असून, यासाठीची सगळ्यात मोठी जबाबदारी आमदार दीपक केसरकर यांनी घेतली असून, गाळ काढण्यासाठी त्यानी डोजर उपलब्ध करून दिला आहे.
