वेळवाडी सडा साठवण टाकीवरून नागरिकांना पाणीपुरवठा करा…

नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांची मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

देवगड वेळवाडी सडा साठवण टाकी वरून नागरिकांना पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा अशी मागणी नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांनी मुख्याधिकारी देवगड जामसंडे नगरपंचायत यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

या पत्रात नमूद केल्याप्रमाणे देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीमधील वेळवाडी सडा येथे साडेसहा लाख लिटर क्षमतेची पाणी साठवण टाकी बांधून पूर्णपणे तयार आहे. सद्यस्थितीत देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील महिला भगिनींना अनियमित व अपुरा कमी दाबाने पाणीपुरवठा होत होत आहे.त्यामुळे पाण्याअभावी नागरिकांना त्रास होत असून या पाणी साठवण टाकीत पाणी साठवण करून देवगड जामसंडे नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा.व त्रासातून मुक्तता मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page