माजी नगसेवक महेंद्र सांब्रेकर यांना मातृशोक

कणकवली ता.०५-:* कणकवली बाजारपेठेतील रहिवासी शकुंतला पुंडलिक सांब्रेकर ( ८० ) यांचे राहत्या घरी वृद्धपकाळाने निधन झाले . त्यांच्या पश्चात एक मुलगा , दोन सुना , नातवंडे असा परिवार आहे . माजी नगरसेवक महेंद्र सांब्रेकर यांच्या त्या मातोश्री तर माजी नगरसेविका माया सांब्रेकर यांच्या त्या सासू होत.

शकुंतला सांब्रेकर यांचे शहरात सोमनाथ स्वीटमार्टचे दुकान होते . या दुकानाच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला होता.शकुंतला यांच्या मनमिळावू स्वभावाने त्या परिचित होत्या. त्यांच्या निधनाबद्दल शहरात हळहळ व्यक्त होत आहे.गुरुवारी सकाळी कणकवली येथील स्मशानभूमीत अत्यसंस्कार करण्यात आले.

You cannot copy content of this page