जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डान्टस यांचे विरण येथे आश्वासन
मालवण।दि प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या थकित खावटी कर्जाबाबत संस्था व जिल्हा बॅंक यांच्या सहविचाराने योग्य तो निर्णय घेवून खावटी कर्जातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डान्टस यांनी विरण येथे बोलताना केले. मालवण तालुक्यातील विरण येथे विरण ग्रृप विकास संस्थेच्या संचालक पदी निवडून आलेल्या सुरेश नेरुरकर व त्यांचे सहकारी संचालकांनी संस्था निवडणुकीत सभासदां दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्याचा उद्देशाने नुकतीच संस्था सभासदांची बैठक विरण दत्त मंदिर येथे घेण्यात आली.
यावेळी शेतकरी कर्जदार सभासदांच्या समस्या व त्यावर उपाय योजना बाबतच्या मार्गदर्शनासाठी जिल्हा बॅंकेचे संचालक व्हिक्टर डान्टस, विरण ग्रृप विकास संघाचे व्यवस्थापक सुरेश नेरुरकर, नाना नेरुरकर,माजी संचालक सुभाष धुरी, जयेश नार्वेकर, बबन परब, मोहन घाडीगावकर, सौ. परब, चंद्रकांत माळकर, सुचिता सावंत, श्रीकृष्ण कुशे यांच्यासह शेतकरी व सभासद उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत सुरेश नेरुरकर यांनी केले.
शेतकऱ्यांचे थकीत खावटी कर्ज, नवीन कर्ज वाटप, खते, बि- बियाणी वाटप, मयत सभासदांचा वारस करून नवीन सभासद नोंदणी करणे, सभासदांना दरवर्षी लाभांश देणे, संस्थेशी आर्थिक व्यवहार न करणाऱ्या किंवा मयत सभासदांचे शेअर्स रक्कम परत देणे या विषयांवर यावेळी बाबत विचार विनीयम करण्यात आले. यावेळी जिल्हा बॅंक संचालक व्हिक्टर डान्टस यांनी या सर्व विषयांवर मार्गदर्शन केले. तर सुरेश नेरुरकर यांनीही आपण शेतकऱ्यांना दिलेला शब्द पुर्ण करणार असून गेल्या अनेक वर्षांतील समस्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन देऊन त्यासाठी सर्वानी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
