प्राचार्य व्ही. जी खोत यांचे प्रतिपादन
मालवण दि -: जिवनात अवघड असे काही नसते आपल्यातील आत्मविश्वास,तसेच स्वत्व जागवल्यानंतर यश हे नक्की मिळेल स्वामी विवेकानंदांनी सुद्धा युवा वर्गाला मार्गदर्शन करताना तरुण कसा असावा या विषयी आत्मविश्वास वाढविण्याबरोबरच निर्भय राहण्याचा संदेश दिला आहे. या संदेशाचे पालन करून विद्यार्थ्यांनी यशस्वी जीवनाची मार्गक्रमणा करावी असे प्रतिपादन भंडारी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य व्ही जी खोत यांनी येथे बोलताना केले. मालवण येथील भंडारी ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या १५७ व्या जयंतीनिमित्त युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य व्ही जी खोत यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी श्री. खोत हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्राध्यापक रूपेश बांदेकर, सौ. प्रभू, समीक्षा कोयंडे, प्रा. स्नेहल पराडकर, जी. टी. दळवी, सुनंदा वराडकर, आदी व इतर उपस्थित होते. प्रारंभी प्रा. रुपेश बांदेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना प्राचार्य खोत म्हणाले, माणूस हा विवेक संपन्न असला पाहिजे त्याला सत्य- असत्या मधील फरक कळला पाहिजे. तसेच त्याचे मन हे स्थिर असले पाहिजे तो चंचल असता कामानये असे झाले तरच तो चांगल्या प्रकारचे जीवन जगू शकतो स्वामी विवेकानंदांनी युवकांना संदेश देताना जीवनाचे हेच सार सांगितले आहेत. विद्यार्थ्यांनीही याच विचारांची कास धरावी असे सांगून श्री. खोत म्हणाले यश खेचून आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. कोणतेही काम निष्ठेने आणि प्रयत्नाने केल्यास यश मिळतेच असे ते म्हणाले. यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने उस्फुर्त वकृत्व स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत २१ विद्यार्थ्यांनी भाग घेतला या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. शेवटी श्री. प्रा. दळवी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनंदा वराडकर यांनी केले.
