दांडेलीतील वॉर्ड क्रमांक 1 मधील मशीन पूर्ववत सुरू

अर्धा तास झाला होता मतदारांचा खोळंबा

*💫बांदा दि.१५-:* सावंतवाडी तालुक्यातील दांडेली मधील वॉर्ड क्रमांक 1 मधील वोटिंग मशीन तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले होते. सुमारे अर्धा तास मतदारांचा खोळंबा झाला होता. परंतु प्रशासनाकडून याची तात्काळ दखल घेऊन बंद पडलेले वॉर्ड क्रमांक 1 मधील वोटिंग मशीन पुन्हा सुरू झाले असून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. तसेच वॉर्ड क्रमांक 2 आणि 3 मधील मतदान व्यवस्थित सुरू आहे.

You cannot copy content of this page