कणकवली-: तालुक्यातील भिरवंडे आणि तोंडवली – बावशी ग्रा.पं. च्या निवडणुकिसाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरळीत मतदान सुरू झाले आहे. दोन्ही ग्रा.पं. साठी एकूण ७ मतदानकेंद्रांवर मतदान सुरू आहे. सकाळी ७ वाजता मतदानाची मॉब टेस्ट घेण्यात आली. आणि सकाळी साडेसात वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी १० वाजेपर्यंत सातही मतडकेंद्रांवर सुरळीत मतदान सुरू असल्याची माहिती तहसीलदार रमेश पवार यांनी दिली.तालुक्यातील गांधीनगर ग्रा.पं. निवडणूक याआधीच बिनविरोध झाली आहे.
भिरवंडे आणि तोंडवली- बावशी ग्रामपंचायतीत मतदान सुरू…
