जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर सुरू असलेले बेमुदत घंटानाद आंदोलन ६४ व्या दिवशीही सुरू…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* आंदोलनाचा आजचा ६४ वा दिवस उजाडला. कालच मा. संदेश पारकर यांनी आज येतो म्हणाले होते परंतु ते त्यांच्या तांत्रिक अडचणी मुळे येऊ शकले नाहीत. तर आज आमच्या वैभववाडी देवगड कणकवली विधानसभेचे सदस्य मा. नितेश राणे फोंडयातील माईन्स कामगारांच्या उपोषणाला भेट दिली. परंतु ते आमच्या आंदोलकांना कडे घाईगडबडीत यायला विसरले असावेत. कुडाळ मनसे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी भेट दिली. असो न्हानू जगन्नाथ सरमळकर यांच्या सह सामान्य प्रशासनाने दिनांक २७ नोव्हेंबर २०२० रोजी ज्यांना सेवाज्येष्ठता डावलून मागासवर्गीयांना यांना पदोन्नती पासून वंचित ठेवले त्यांना पदोन्नती मिळेपर्यंत, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद फंडातून नियमबाह्य पद्धतीने पदभरतीची माहिती चा अहवाल सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कडून शासनाला सादर करेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आहे, अशी माहिती दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा शाखा सिंधुदुर्ग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी दिली.

You cannot copy content of this page