त्रिंबक येथील स्नेहल घाडीगांवकर यांना रोटरी क्लब कणकवली सेंट्रलतर्फे व्हील चेअर प्रदान

कणकवली ता.०५-:* मालवण तालुक्यातील त्रिंबक येथील स्नेहल घाडीगांवकर यांना रोटरी क्लब कणकवली सेंट्रल यांच्या सौजन्याने व्हील चेअर प्रदान करण्यात आली. यावेळी स्नेहल यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे दिसून आले.

यावेळी उपस्थित रोटरी क्लब कणकवली सेंट्रलचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, सदस्य डॉक्टर सुहास पावसकर, खजिनदार रवी मुसळे, डॉ.सिद्धेश सकपाळ, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, घाडीगांवकर समाज संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय गांवकर, स्नेहल यांचे पती विठ्ठल घाडीगांवकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page