कणकवली ता.०५-:* कास्ट्राईब आरोग्य कर्मचारी संघटनेची सहविचार सभा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . महेश खलिफे यांच्या उपस्थितीत कास्ट्राईब् कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष समाज भुषण संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी आरोग्य कास्ट्राईब् कर्मचारी संघटना जिल्हा अध्यक्ष संजय जाधव, महासचिव दीपक कांबळे , जेष्ठ उपाध्यक्ष महेंद्र कदम, जेष्ठ उपाध्यक्ष बी एच कदम, सह सचिव चंद्रमणी कदम , संघटक अविनाश धुमाळे उपस्थित होते.
सदर वेळी पदोन्नती प्रक्रिया राबाविताना सेवा जेष्ठता याद्या ह्या शासन निर्णया प्रमाणे व्हाव्यात, जोपर्यंत अनुक्रम नंबर प्राप्त होत नाही तोपर्यंत आरोग्य् सेवक पुरुष पदाची पदोन्नति प्रक्रिया राबविण्यात येऊ नये. अंतिम याद्या उपरोक्त शासन निर्णया प्रमाणे प्रसारीत करण्यात् याव्यात असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले .
तेव्हा जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी संघटनेने उपस्थित केलेला मुद्दा हा योग्य असून शासन निर्णया प्रमाणे लवकरात लवकर कार्यवाही केली जाईल असे सांगण्यात केले. तसेच आश्वासित प्रगती योजनेतील 10, 20 ,30 च्या लाभाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याबाबत कास्ट्राईब संघटनेच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सांगण्यात आले . त्यावेळी याबत लवकरात लवकर आश्वासित प्रगती योजनेचा लाभ कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असून किती लाभार्थी आहेत याची तपशिलवार् माहिती कास्ट्राईब आरोग्य संघटनेला देण्यात आली.
एन सी डी इन्सेटिव्ह कणकवली तालुका तसेंच अन्य तालुकामध्ये आरोग्य सेवक सेविका यांना मिळत नसले बाबत तसेंच संबंधित व्यक्ती समाधान कारक उत्तर देत नसलेबाबत संघटनेच्या वतीने प्रश्न उपस्थित करण्यात आला सदरवेळी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी एन सी डी प्रमुख श्रीम् कृपा गावडे याना बोलवुन याबाबत विचारना केली , तसेंच कणकवली तालुका डी पी एम निखिल जाधव यांना याबाबत विचारणा केली तसेंच इथून पुढे असे होणार नाही याची ग्वाही देण्यात आली. कोविड 19 आजार काळामध्ये सर्व आरोग्य कर्मचारी अधिकारी यांनी अतिशय चांगले काम केले, त्यामुळे त्यांना प्रोत्साहन म्हणुन प्रशासनामार्फत प्रशस्ती पत्रके देवून त्यांचे अभिनंदन करावे असे कास्ट्राईब आरोग्य संघटनेच्या वतीने सांगण्यात आले .
समुदाय आरोग्य अधिकारी यांना आरोग्य सेवक ,सेविका यांच्याशी समन्वयाने काम करण्या संदर्भात आदेशीत करण्यात यावे. कास्ट्राईब संघटनेने सी . एच .ओ यांना आम्ही अधिकारी मानत नाही अशी भूमिका घेऊन कोणत्याही पद्धतीने त्यांची मुजोरी सहन करणार नाही अशी ठाम भूमिका कास्ट्राईब संघटनेने घेतली.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी समुदाय आरोग्य अधिकारी हे आरोग्य सेवक / सेविका यांचे वरिष्ठ अधिकारी नसून त्यांना स्थायी कर्मचारी यांच्यावर कोणतेही नियंत्रण अधिकार नसल्याचे स्पष्ट केले, तसेंच सदरची सूचना सी एच ओ यांना मिटिंग मध्ये वेळोवेळी केल्याचे स्पष्ट केले. तसेच कनिष्ठ सहायकांना दैनंदिनी देणे बाबत कास्ट्राईब संघटनेने लेखी स्वरूपात तीव्र विरोध केला . कनिष्ठ सहायक हे आरोग्य सेवक, सेविका या पदाचे वरिष्ठ नसून केलेल्या कामाची मासिक दैनंदिनी ही केवळ आरोग्य सहायक् यांना देण्यात येईल, अन्य कोणतीही वेगळी दैनंदिनी ही दिली जाणार नाही अशी ठाम भुमिका संघटनेने घेतली.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी ही बाब मान्य करून कनिष्ठ सहायकाना फक्त मस्टर् देण्यात यावे व दैनंदिनी ही आरोग्य सहायक यांच्याजवळ् देण्यात यावी असे स्पष्ट केले.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सहकार्याची भूमिका घेऊन कास्ट्राईब संघटनेच्या मागण्या लवकरच पूर्ण केल्या जातील अशी ग्वाही दिली , यावेळी अति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे , जिल्हा हिवताप् अधिकारी डॉ कर्तसकर , कक्ष अधिकारी श्री . झाडे उपास्थित होते. शेवटी कास्ट्राईब आरोग्यसंघटनेचे महासचिव दीपक कांबळे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
