हातभार चॅरिटेबल ट्रस्ट व श्री कुलदेवता युवक कला क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या आरोग्य शिबिराचे आयोजन

सावंतवाडी ता 30: हातभार चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग यांच्या सौजन्याने व श्री कुलदेवता युवक कला क्रीडा मंडळ यांच्य संयुक्त विद्यमाने 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे स 9 ते दु 2 या वेळेत श्री कुलदेवता मंदिर वरची मळेवाड-देऊळवाडी येथे हा शिबीर होणार असून गरजूंना लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या शिबिरात 50 टक्के सवलतीचा दारात चष्मा उपलब्ध होणार आहेत या मोफत आरोग्य शिबिरात नेत्र तपासणी, हृदय तपासणी कर्करोग तपासणी, स्त्रीरोग तपासणी, गुडगेदुखी, कंबरदुखी, मणकेदुखी तपासणी मुळव्याध, मुतखडा, हर्णिया व इतर आजार कान, नाक, घसा तपासणी आदी सेवा दिल्या जाणार आहेत तसेच प्रतीवर्षी प्रमाणे ह्या वर्षी देखील महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून श्री कुलदेवता युवक कला क्रीडा मंडळ, मळेवाड यांच्यावतीने श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे दु 2 वा भक्तागनानी तीर्थ प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे तर रात्री 9 वा रेम्बो फ्रेन्डसर्कल कवठणी निर्मित 2 अंकी तुफान विनोद मालवणी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे

You cannot copy content of this page