सावंतवाडी ता 30: प्राचार्य डॉ. अनंत रावजी शिंदे आदर्श शिक्षक पुरस्कार आणि प्राचार्य ज. बा. शिरोडकर आदर्श विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळा 1 मे रोजी येथील आर पी डी हायस्कूल येथे सकाळी 9 30 वा होणार आहे या पुरस्कारांचे वितरण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत, सचिव मा. व्ही. बी. नाईक, खजिनदार मा. सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर यांचे हस्ते आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक, सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आर पी डी हायस्कूल च्या वतीने करण्यात आले आहे
आदर्श शिक्षक आणि आदर्श विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्या आयोजन…
