शहरातील विविध विकासकामांचे उद्या लोकार्पण व भूमिपूजन…

आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार लोकार्पण…

सावंतवाडी ता.३०-:* महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून उद्या सावंतवाडी शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी नगरपरिषद वैशिष्ठ्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत हिरवळीच्या खेळपट्टीचा भूमिपूजन सोहळा जिमखाना मैदान येथे सायंकाळी ४:३० वाजता होणार आहे. तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून पी एस ए मेडिकल ऑक्सिजन प्लांटचा लोकार्पण सोहळा उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे सायंकाळी ५:०० वाजता होणार आहे. तर आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा नगरपरिषद सावंतवाडी येथे सायंकाळी ५:३० वाजता संपन्न होणार आहे. यावेळी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर उपस्थित राहणार असून, महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page