आजरा फाटा येथे आयशर आणि टेम्पो ट्रॅव्हल यांच्यात अपघात….

काही प्रवासी जख्मी; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

आंबोली, ता.२९-:* येथील आजरा फाटा येथे आयशर आणि टेम्पो ट्रॅव्हल यांच्यात अपघात झाला.यात काही जण जखमी झाले.यातील यवन कोकाटे आणि सहर्ष कोकाटे रा.पिंगुळी (सर्वजण)हे दोघे जण गंभीर जखमी झाले.दोघांच्या पायाला मोठी दुखापत झाली. आदामापुर बाळूमामा येथून दर्शन घेऊन परत येताना सकाळी अपघात झाला.

अपघातानंतर आंबोली आरोग्य केंद्रात १०८ रुग्णवाहिका ने चालक अर्जुन राऊत याने आरोग्य केंद्रात दाखल केले.यावेळी येथील डॉक्टर महेश जाधव आणि आदिती पाटकर यांनी जखमींवर उपचार केले.यानंतर पुढील उपचारासाठी सावंतवाडी येथे नेण्यात आले.आंबोली पोलिसांनी पंचनामा केला.याठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावडे यांनी जखमींची विचारपूस केली.

You cannot copy content of this page