ओवळीये येथे महिलांसाठी मसाले, लोणचे, पापड बनविण्याचे प्रशिक्षण सुरू….
सावंतवाडी ता.२९-:महिला सक्षमीकरणासाठी ओवळीये ग्रामपंचायतच्या सौजन्याने १४ व्या वित्त आयोग निधीमधून युवा परिवर्तन यांच्या माध्यमातून गावातील महिलांना स्वयंरोजगार करता यावा यासाठी मसाले, लोणचे आणि पापड बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत असून, गावातील महिलांनी स्वतः या वस्तू बनवून बाजारात विकून आर्थिक विकास करावा आणि स्वतः सक्षम व्हावे हा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
यावेळी गावचे सरपंच श्री विनायक सावंत, उपसरपंच सागर सावंत , ग्रा. प. सदस्य श्री मनोज सावंत, राजेश सावंत, संजना सावंत, तारामती नाईक, जयश्री सावंत, स्वेता सावंत, ग्रामसेवक श्री आनंद परब ग्राम. संघ अध्यक्ष प्रेरणा सावंत, बचत गट CRP शकुंतला राऊळ, डाटा ऑपरेटर गावडे, मडगांवकर, शिपाई रोशन सावंत आणि मोठया संख्येने महिला मंडळ उपस्थित होते.
