“त्या” उपोषणावर संबंधित अधिकाऱ्यांनी तोडगा काढावा…

आमदार दीपक केसरकर यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

दोडामार्ग ता.२९-:* दोडामार्ग तालुक्यातील काही विकास कामे यांना चालना मिळावी यासाठी १ मे रोजी दोडामार्ग तालुक्यात तहशीलदार कार्यालयात सायंकाळी आम.दिपक केसरकर यांनी नायब तहशीलदार पोलिस निरिक्षक सोबत चर्चा करुन संबधित विभागाचे अधिकारी सोबत संपर्क साधून काही उपोषणावर तोडगा काढला .तर जी उपोषण आहेत ती देखील संबधित अधिकारी यांनी तोडगा काढावा अशा सूचना केल्या .

सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार दिपक केसरकर यांनी राञी दोडामार्ग तहशीलदार कार्यालय येथे १ मे रोजी होणाऱ्या उपोषणा बाबब बांधकाम विभाग,महसूल विभाग,जलसंपदा विभाग यांच्या संदर्भात उपोषण चर्चा केली. यावेळी नायब तहशीलदार सत्यवान गवस,एन.एन.देसाई, पोलिस निरिक्षक संदीप भोसले, शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी,तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस,गोपाळ गवस,तिलकाचन गवस,संदीप गवस,बबलू पांगम, आदी तसेच बांधकाम विभाग कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page