अवकाळी पावसाचा तालुक्यातील खोक्रल गावाला तडाखा ..

घराचे छप्पर उडून नुकसान

*⚡दोडामार्ग ता.२९-:* गुरुवारी राञी झालेल्या अवकाळी वादळी पावसाने दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांना झोडपून काढले त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.खोक्रल गावाला मोठा वादळी पावसाचा तडाखा बसला.येथी अनिल सखाराम गवस यांच्या घरांवर घातलेले पञ्याचे छप्पर लोंखडी चानलसह उडून जाऊन दूरवर पडले त्यामुळे घरात पावसाचे पाणी. पडूनट नुकसान झाले.शिवाय इतर लोकांच्या देखील काजू,केळी,फळझाडे यांचे नुकसान झाले.

दोडामार्ग तालुक्यात गुरूवारी राञी वादळी वाऱ्या पावसाने दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांना झोडपून काढले त्यामुळे अनेक गावातील जन जीवन विस्कळीत झाले.दोडामार्ग बाजारपेठेत पणजी दोडामार्ग रस्त्यावर झाडांची फांदी तसेच वीज तारा रस्त्यावर आल्या त्यामुळे जवळ जवळ धो धो पावसात वाहने अडकून पडली.

You cannot copy content of this page