प्राथमिक शाळा नं ४ येथे आ दीपक केसरकर यांचे प्रतिपादनआ केसरकर, माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्याहस्ते आयएसओ मानांकन शाळेला प्रदान
सावंतवाडी ता.२९-:* मी जेव्हा पालकमंत्री होतो “त्या” वेळेस मी ही इमारती उभारण्यासाठी निधी दिला होता. परंतु नुसता निधी देऊन, शाळा उभी राहून चालत नाही. तर ती मेन्टेन करणं हे देखिल तितकच महत्वाच आहे. तसेच ही शाळा कशाप्रकारे विद्यार्थ्यांना उपयुक्त बनवली पाहिजे त्यासाठी तुम्ही केलेल्या प्रयत्नांचं मी तुमचे सर्व पालकांचे आभार मानतो. असे गौरवोद्गार आमदार दीपक केसरकर यांनी काढले.जि.प प्राथमिक शाळा नं.४ चा आयएसओ मानांकन प्रदान सोहळा आज आमदार दीपक केसरकर व संजू परब यांच्या उपस्थितीत पार पडला.
तसेच आमदार दीपक केसरकर बोलताना म्हणाले की आज सर्वात जास्त पटसंख्या ही आपल्या शाळेची असून ग्रामीण भागातून विद्यार्थी आज शहरातील शाळेत शिकायला येतात अशा वेळा शहरातील दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी या शाळेत येतात ते खरोखरच कौतुकास्पद बाब आहे असे केसरकर यावेळी बोलताना म्हणाले.
तसेच सावंतवाडीच्या विकासासाठी तुमच आमचं बघायचं नसत. ज्या ज्या वेळी काम करण्याची संधी मिळते. त्या त्या वेळी आपण काम केलं पाहिजे की सावंतवाडीची संस्कृती आहे. आणि सावंतवाडी संस्कृती प्रेमाची संस्कृती आहे. शक्ती आपण जपली पाहिजे असेही केसरकर म्हणाले. तसेच या शाळेसाठी सोलार बसवण्यासाठी आपण आमदार निधीतून निधी देऊ असाही शब्द केसरकर यांनी व्यासपीठावर बोलताना दिला.
यावेळी व्यासपीठावर महेश धोत्रे, रामचंद्र अंगणे, कल्पना बोडके स्नेहा लंगवे, आदी उपस्थित होते.
