सिंधुदुर्गनगरी ता.२८-:* महाराष्ट्र राज्य, अनुसूचित जाती जमाती आयोग गुरुवार दिनांक 12 मे 2022 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्याचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा)ज .मो. अभ्यंकर असून आर.डी. शिंदे सदस्य (सेवा) के.आर. मेढे सदस्य (सामाजिक व आर्थिक ) याचा समावेश आहे. याचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार दि. 11 मे 2022 रोजी रात्री 11 वाजता मुबंई येथून कोकणकन्या एक्सप्रेसने सिंधुदुर्ग (ओरोस)कडे प्रयाण. गुरुवार दि.12 मे 2022 रोजी सकाळी 6.34 वाजता सिंधुदुर्ग (ओरोस) येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे रवाना सकाळी 11 ते 1 जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग सभागृह येथे, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व खातेप्रमुख जिल्हा परिषद यांचे सोबत आढावा बैठक. दुपारी 1 ते 2 राखीव . दुपारी 2 ते 2.30 पर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,सिंधुदुर्ग कडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा आढावा तसेच समितीला येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा. दुपारी 2.30 ते 3 वाजता अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हयांचा जिल्हा पोलीस अधिक्षक सिंधुदुर्ग यांचे सोबत आढावा व चर्चा. दुपारी 3 वाजता सिंधुदुर्ग येथून डीव्हीकारने रत्नागिरीकडे प्रयाण.
