*⚡मालवण ता.२८-:* ऑल इंडिया सलून अँड ब्युटीपार्लर आर्टिस्ट असोसिएशन च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी मालवण येथील ब्युटीशीयन सौ. सायली सलील मांजरेकर यांची निवड करण्यात आली आहे. सौ. मांजरेकर यांच्याकडे यापूर्वीपासून असोसिएशनच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारीही आहे. सौ. सायली मांजरेकर या गेली १६ वर्षे मालवणात ब्युटीशीयन म्हणून काम करत आहेत.
शासनमान्य ब्युटीपार्लर कोर्स द्वारे त्यांनी अनेक तरुणींना ब्युटीपार्लर क्षेत्रात करियर घडविण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. यापुढे तळागाळातील ब्युटीपार्लर व्यावसायिकांना पुढे आणण्यासाठी आपण कार्य करणार असल्याचे सौ. मांजरेकर यांनी सांगत अशा ब्युटीपार्लर व्यावसायिकांनी आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. सौ. मांजरेकर यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
