सावंतवाडी ता.२८-:* निरवडे सिद्धार्थ नगर येथे आज विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात गावातील विविध मान्यवर तसेच आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते
निरवडे गावचे सरपंच हरी वारंग तसेच जिल्हा परिषद सदस्य उत्तम पांढरे, माझी सरपंच प्रमोद गावडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ युवा कला क्रीडा मंडळ निरवडे यांच्यावतीने ह्या जयंती व अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या अभिवादन सभेत प्राध्यापक देवदास बोर्डे तसेच सन्मानीय प्रमोद चव्हाण मार्गदर्शन उपस्थितांना मार्गदर्शन केले
