कोळेकर भगिनींसाठी मुख्याधिकारी जावडेकर यांचा मदतीचा हात

माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांनी मदतीचे केले आहे आवाहन

सावंतवाडी ता.२८-:* गरीब कोळेकर भगिनींच्या घर उभारणीसाठी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी शहरवासीयांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील शहराचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी तब्बल 37 हजार रुपयाचे पत्रे देऊन सिंहाचा वाटा उचलला आहे. याबाबत श्री साळगावकर यांनी त्यांचे आभार व्यक्त केली आहेत.

कोळेकर भगिनींच्या बाबत वृत्तपत्रातून व सोशल मिडिया च्या माध्यमातून मदतीचे आवाहन करण्यात आले होते त्यानंतर श्री साळगावकर यांच्याकडे शहरातील काही जणांनी रोख रक्कम जमा केली आहे अशाच प्रकारे मदतीसाठी लोकांनी पुढे यावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page