बांदा सटमट येथे डंपर-टेम्पोचा अपघात

बांदा ता.२४-:* मुंबई-गोव‍ा महामार्गावर बांदा सटमट सर्कल येथे डंपरला पाठीमागून करवाहू टेम्पोने जोरदार धडक दिली. या अपघात टेम्पोचे दर्शनी भागाचे मोठे नुकसान होऊन वाहनचालक किरकोळ जखमी झाला. अपघात मंगळवारी सायंकाळी घडला. बांदा पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी मुंबई-गोवा महामार्गावर बांदा सटमट सर्कल येथे डंपरला मागुन टेम्पो (टीएन०२ बीुयु८७६०)ने जोरदार धडक दिली.

टेम्पो मध्ये गोव्यातून कुडाळ येथील शोरुममध्ये विक्रीसाठी नवीन कार नेण्यात येत होते. या अपघात टेम्पोचे दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले असून वाहनचालन बालाबल बचावला. सायंकाळी उशीरा बांदा पोलीस अपघातस्थळी दाखल होत पंचनामा सुरु होता. बांदा पोलीसांत रात्री उशीरापर्यंत अपघात नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होतो.

You cannot copy content of this page