दांडी शाळेमध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न

*⚡मालवण ता.२४-:* मालवण दांडी शाळेमध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न झाला. मुलांच्या शिक्षणात माता पालकांचा सहभाग वाढावा गावात शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे ५ ते ७ या वयोगटातील जी मुले या वर्षी पहिल्या वर्गात दाखल होणार आहेत, त्यांना अंक ओळख,अक्षर ओळख, सोप्या शब्दांचे वाचन, पूर्ण वाक्यात बोलता यावे,जेणेकरून पुढे जाऊन त्या मुलांना वाचन लेखन करताना कोणतेही अडथळे निर्माण होऊ नये याकरिता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी या मुलांना मुकुट घालून दांडी गावातून वाजतगाजत फेरी काढण्यात आली. त्यानंतर मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हेमंत चिंदरकर यांच्या हस्ते तर दीप प्रज्वलन उपाध्यक्ष पंकज धुरी व मुख्याध्यापिका सौ.विशाखा चव्हाण व माता पालक यांच्या हस्ते करून करण्यात आले. उपस्थित पालकांना शिक्षक शिवराज सावंत सौ. मनीषा ठाकुर यांनी मार्गदर्शन केले व रामदास तांबे यांनी विद्यार्थ्यांना केले. मेळाव्याला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हेमंत चिंदरकर, उपाध्यक्ष पंकज धुरी, शिक्षणप्रेमी सदस्य दिनकर शेलटकर, प्रकाश सारंग, सौ.सुलभा खवणेकर, रुपेश धुरी, दयानंद मालंडकर, स्वयंसेवक कु.आचल मांजरेकर, कु.तेजला सरमळकर, कु.संतोष तांबे, कु.प्रथमेश राऊळ, कु.प्रणया मांजरेकर तसेच दांडी शाळा पालक व दांडी ग्रामस्थ उपस्थित होते. मेळावा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सौ.विशाखा चव्हाण, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.शिवराज सावंत, सौ.मनीषा ठाकूर, रामदास तांबे, दांडी अंगणवाडी सेविका सौ.राधिका मोरजकर, मदतनीस सौ.जेनी, दांडी महापुरुष अंगणवाडी सेविका सौ.कांचन परब, मदतनीस सौ.मनीषा बाणावलीकर यांनी मेहनत घेतली.

You cannot copy content of this page