रुपेश राऊळ; जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना संधी न दिल्यास ३० एप्रिल ला परीक्षा केंद्रावर आंदोलन…
*⚡सावंतवाडी ता.२६-:* सिंधुदुर्गातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात परराज्यातील मुलांना प्रवेश मिळावा यासाठी सिंधुदुर्गातील काही शाळांमध्ये परराज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असून, परराज्यातील मुलांना या परीक्षेत बसविण्यात येणार असून, नाममात्र प्रवेश देऊन या परीक्षेला बसविण्याचा गैरप्रकार सुरू असल्याचे पुरावे आपल्या हाती लागले असल्याचे शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत उघड केले आहेत.
यावेळी त्यांनी या परीक्षेसाठी पर राज्यातील विद्यार्थ्यांना संधी न देता जिल्ह्यातील मुलांना संधी द्यावी अन्यथा 30 एप्रिल रोजी शिवसेना परीक्षा केंद्रावर निषेध आंदोलन करणार असल्याचं इशारा दिला आहे.
