मिलिंद नाईक, अरुण परब यांचा इशारा…
दोडामार्ग ता.२६-:* गेल्या वर्षी २९ जुलै रोजी कळणे खाण फुटून खाणीतील पाणी दगड माती यामुळे कळणे उगाडे रस्त्यावर असलेली मोरी वाहुन जाऊन शासनाचे पन्नास लाखांचे नुकसान झाले.आता दुसरा पावसाळा आला तरी कळणे खाण कंपनीने बांधकाम केले नाही.निधी दिला नाही त्यामुळे पावसा दहा गावांचा संर्पक तुटणार आहे.त्यामुळे पावसांपूर्वी मोरीचे बांधकाम सुरु न झाल्यास तसेच कळणे डबीवाडी धोकादायक झाडांची छाटनी केली नाही तर दोडामार्ग तहशीलदार कार्यालय दोडामार्ग येथे १० मे रोजी उपोषणाला बसण्याचा इशारा मिलिंद नाईक ,अरुण परब यांनी दिला आहे.
