वरसकर हायस्कुलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा निकाल जाहीर

मालवण ता.२६-:* वराड येथील सौ. हिराबाई भास्कर वरसकर विद्यामंदिर व वराड कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध लेखन, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

निकाल पुढीलप्रमाणे- निबंध लेखन स्पर्धा – प्राथमिक गट (इयत्ता ५ वी ते ८ वी)- प्रथम – रिंकी संतोष लाड (शां. वि. कुलकर्णी माध्यमिक विद्यामंदिर, मोड), द्वितीय- अमृता अरविंद पास्ते (कलंबिस्त इंग्लिश स्कुल), तृतीय- पूर्वा निलेश आरावंदेकर (न्यू इंग्लिश स्कुल, उभादांडा). माध्यमिक गट (इयत्ता ९ वी ते १२ वी)- प्रथम- समीक्षा किशोर भगत (वरसकर विद्यामंदिर, वराड), हृतिका रविकांत पेंडूरकर (माध्यमिक विद्यामंदिर, कनेडी), तृतीय-प्रेरणा अनभवणे ((शां. वि. कुलकर्णी माध्यमिक विद्यामंदिर, मोड). या स्पर्धेचे परीक्षण महेश परब, रामलाल अहिरे, सौ. दिव्यता परब यांनी केले.

वक्तृत्व स्पर्धा- प्राथमिक गट (५ वी ते ८ वी) – प्रथम – तनुश्री प्रकाश मसुरकर (माध्यमिक विद्यामंदिर कनेडी), द्वितीय- सई राजेंद्र सावंत (शिरगाव हायस्कुल), तृतीय- अस्मि प्रवीण मांजरेकर (आर. पी. डी. हायस्कुल), माध्यमिक गट (इयत्ता ९ वी ते १२ वी) – प्रथम- एकता नारायण मसुरकर (वरसकर हायस्कुल, वराड), द्वितीय- हिंदवी सुनील गावकर (माध्यमिक विद्यामंदिर कनेडी), तृतीय- विघ्नेश वारंग (खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कुल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय, बांदा). या स्पर्धेचे परीक्षण शैलेश मुळीक, ममता गावडे, सौ. दिव्यता परब यांनी केले. जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा- लहान गट (५ वी ते ८ वी)- प्रथम- निशांत प्रसाद राणे (विद्यामंदिर कणकवली), द्वितीय- साईराज सचिन अदम (शिरगांव हायस्कुल), तृतीय- अथर्व मंगेश गायकवाड (जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा, तिरवडे). मोठा गट (९ वी ते १२ वी) – प्रथम- मितेश राजेंद्र पाताडे (माध्यमिक विद्यामंदिर, कनेडी), द्वितीय- प्रसाद सुहास कदम (शिरगांव हायस्कुल), तृतीय- विराज विकास वराडकर (वरसकर विद्यामंदिर, वराड).

You cannot copy content of this page