फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचची बैठक संपन्न

वेंगुर्ला ता.२६-:* छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, शाहू महाराज व डॉ.आंबेडकर यांची विचारधारा एकच होती. त्यामुळे फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच वेंगुर्लातर्फे त्यांची एकत्रित जयंती मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेंगुर्ला येथे करण्याचे व या कार्यक्रमास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना निमंत्रित करण्याचे ठरले.

फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच वेंगुर्लाची बैठक साई मंगल कार्यालयात मंचचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रा.सुनिल भिसे, के.जी.गावडे, प्रदिप सावंत, लाडू जाधव, विमल शिगाडे, आ.ए.श्रीसुंदर, असद मकानदार आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page