वेंगुर्ला ता.२६-:* वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद हॉलमध्ये मेंगलोर येथील अस्थिरोगतज्ज्ञ व गुडघारोपण शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ.योगीश कामत यांचे ‘वयपरत्वे घ्यावयाची गुडघ्यांची काळजी‘ यावर व्याख्यान संपन्न झाले. यात त्यांनी फास्ट चालल्यावर गुडघे दुखतात, चालणे थांबवावे का? मला पाय-या चढताना त्रास होतो, काय करु? मला गुडघेदुखीमुळे योगासने करता येत नाहीत. यावर उपाय काय? वयपरत्वे गुडघेदुखी वाढू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी? कोणता व्यायाम गुडघ्यांसाठी चांगला? या व यासारख्या असंख्य शंकांचे शास्त्रीयदृष्ट्या निरसन आणि मार्गदर्शन केले.
वेंगुर्ला मेडिकल असोसिएशन, वेंगुर्ला नगरपरिषद, लिनेस क्लब ऑफ वेंगुर्ला, ह्युमन राईट्स असोसिएशन, ज्येष्ठ नागरीक संघटना, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ यांच्यामार्फत ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ.राजेश्वर उबाळे, डॉ.संजिव लिगवत, डॉ.प्रल्हाद मणचेकर, डॉ.नामदेव मोरे, डॉ.प्रसाद साळगांवकर, एस.एस.काळे, कैवल्य पवार, सतिश डुबळे, आनंद सारंग, कविता भाटीया, मंदा सामंत, अॅड. सुषमा प्रभूखानोलकर, डॉ.आर.एम.परब, रा.पां.जोशी यांच्यासह सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ पदाधिकारी व शहरातील नागरिक उपस्थित होत. या कार्यक्रमात डॉ.प्रल्हाद मणचेकर, डॉ.राजेश्वर उबाळे, डॉ.संजिव लिगवत, डॉ.अश्विनी सामंत, डॉ.प्रविण देसाई, सिस्टर कृडेन्स डिसोजा, विनिता तांडेल, रमेश टेमकर, संतोष चव्हाण, डॉ.आर.एम.परब व डॉ.दर्शेश पेठे यांचा सत्कार करण्यात आला.
