वेळागर येथे बीच रस्सीखेच स्पर्धा

वेंगुर्ला ता.२६-:* महाराष्ट्र राज्य रस्सीखेच संघटनेतर्फे सिधुदुर्ग जिल्हा रस्सीखेच संघटनेच्या सहकार्याने २७ ते ३० मे या कालावधीत शिरोडा-वेळागर येथे अखिल भारतीय बीच रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन केले आहे.

येथील साई डिलक्स हॉलमध्ये झालेल्या बैठकीवेळी महाराष्ट्र रस्सीखेच संघटनेच्या अध्यक्ष माधवी पाटील, सचिव जनार्दन गुपिले, राज्य कोषाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, सिधुदुर्ग जिल्हाध्यक्ष जयप्रकाश चमणकर, सचिव किशोर सोन्सुरकर, निलेश चमणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर राज्य पदाधिका-यांसह राज्य संघटनेच्या अध्यक्षा माधवी पाटील यांनी शिरोडा-वेळागरला भेट देऊन स्पर्धेच्या जागेची पहाणी केली. यावेळी वेळागरवासीय आजू आमरे, समिर भगत, आग्नेल सोज, आब्राव मेनास, संतोष भगत, आनंद आमरे, उदय भगत, पेद्रु फर्नांडीस, फास्कू फर्नांडीस, चंद्रशेखर भगत, रुपेश तारी आदींसोबत खेळाचे मैदान, राहण्याची सोय व अन्य सुविधांची चर्चा करण्यात आली.

You cannot copy content of this page