आमदार दीपक केसरकर मडूरा वसियांची करत आहे दिशाभूल; संजू परब यांचा आरोप
सावंतवाडी ता.२६-: मडूरा येथील “त्या” पुलाला अद्याप प्रशासकीय मंजुरी मिळाली नसून, आमदार दीपक केसरकर हे मडूरा वासियांची फसवणूक करत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केला आहे. याबाबत आज सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अनिल आवटी यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, त्यांनी या कामाला अजुन मंजुरी मिळाली नसल्याचे सांगितले आहे.
