सावंतवाडी गरड येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

*⚡सावंतवाडी ता.२४-:* शहरातील गरड येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित), सावंतवाडी आयोजित या धार्मिक सप्ताहा मुळे परिसराचे वातावरण भक्तिमय बनले असून दर दिवशी शेकडो भाविक या याग उत्सवामध्ये सहभागी होत आहेत.

तरी या उत्सवाचा लाभ स्वामी भक्तांना घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रातर्फे करण्यात आले आहे. 22 एप्रिल पासून सुरु झालेल्या या सप्ताहाची सांगता 28 एप्रिल रोजी होणार आहे.

You cannot copy content of this page