युवा पिढीने वाचनासाठी थोडा वेळ द्यावा:पी.जे.कांबळे

जागतिक पुस्तक दिनानिमित्त नगरवाचनालयात पुस्तक प्रदर्शन

कणकवली ता.२३-:* ज्या देशामध्ये ग्रंथालये विकसित असतात,तो देश खऱ्या अर्थाने वैचारिकदृष्ट्या समृद्ध असतो.भारतामध्ये आजपर्यंत जे – जे महामानव होऊन गेले.त्यांनी आपल्या जडणघडणीत वाचनाला महत्त्व दिले होते.त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास झाला.आजची पिढी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते या पिढीने वाचनासाठी थोडा वेळ काढला पाहिजे.तरुण – तरुणींना वैचारिकदृष्ट्या समृद्ध व्हायचे असले तर त्यांनी ग्रंथालयांमध्ये येऊन पुस्तके वाचायला हवीत,असे प्रतिपादन नगरवाचनालयाच्या कार्यकारिणीचे सदस्य पी.जे. कांबळे यांनी केले.

जागतिक पुस्तकदिनानिमित्त येथील नगरवाचनालयामध्ये कार्यक्रम आयोजित केला होता.या प्रसंगी ते बोलत होते.यावेळी वाचनालयाचे कार्यवाह हनीफ पिरखान,सहकार्यवाह डी.पी. तानावडे,नगरसेविका मेघा गांगण , रवींद्रनाथ मुसळे ,ग्रंथपाल जान्हवी जोशी,विद्यार्थी प्रतिनिधी वेदांत बंड आदी मान्यवर तसेच नगरवाचनालय कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते. श्री कांबळे म्हणाले,आजच्या आधुनिक युगात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे.ही संस्कृती लोप पावू नये म्हणून वाचनप्रेमींनी लोकांनी पुढाकार आजची तरुण पिढी सोशल मीडियाच्या विळख्यात अडकलेली आहे.

या पिढीला वाचनाकडे वळविण्यासाठी कृतिशील उपक्रम वाचनालयांतर्फे हाती घेण्यात येत असून याचा विद्यार्थी वर्गाने लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून तुम्हाला तुमची ज्ञानकक्षा वाढवायची असेल वाचनासाठी थोडा वेळ काढावा ,असे आवाहन त्यांनी केले.दरम्यान , जागतिक पुस्तक दिनानिमित्त वाचनालयात पुस्तक प्रदर्शन भरविले होते.या प्रदर्शनास वाचनप्रेमी व विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.पी. तानावडे यांनी तर आभार रवींद्र मुसळे यांनी मानले.

You cannot copy content of this page