प्राथमिक शिक्षक संघाचा स्नेहमेळावा संपन्न

वेंगुर्ला प्रतिनिधी- अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा वेंगुर्ला तालुकाच्या स्नेहमेळावा साई मंगल कार्यालय येथे तालुकाअध्यक्ष एकनाथ जानकर यांचे अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. याच कार्यक्रमात संघाच्या तालुका शाखेने आयोजित केलेल्या दी स्कॉलर ऑफ वेंगुर्ला अवार्ड २०२० व २०२२ च्या विजेत्या विद्यार्थ्यांना तसेच सन २०२०-२०२१ मध्ये शिष्यवृत्ती धारक ठरलेल्या विद्यार्थ्यांना आणि तालुक्यातील १६ उपक्रमशील शिक्षकांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन ‘बेस्ट टीचर अवॉर्ड‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी व्यासपिठावर अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक जिल्हाध्यक्ष राजा कविटकर, राज्य संयुक्त राज्य संयुक्त चिटणीस म.ल.देसाई, राज्य संघटक, प्रशांत पारकर, जिल्हा प्रवक्ता तथा माजी जिल्हाध्यक्ष के.टी.चव्हाण, गुरूदास कुबल, जिल्हा सरचिटणीस बाबाजी झेंडे, महिला सेल सचिव अनिषा झोरे, प्रशांत वारंग, शालन पारकर, वैदेही गोसावी, भास्कर पुरळकर आदी उपस्थित होते.

२०१९ ते एप्रिल २०२२ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या १७ शिक्षकांचा तसेच विविध पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तर आदर्श शिक्षक डॉ.चंद्रकांत सावंत व तेजस बांदिवडेकर यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अन्यायग्रस्त शिक्षकांच्या पाठिशी ठामपणे उभे राहून लोकशाहीच्या मार्गाने शिक्षकांना न्याय मिळवून देणारी, शिक्षकांच्या प्रश्नांसाठी तालुका ते राष्ट्रीय पातळीवर लढा उभारणारी एकमेव अखिल संघ ही संघटना आहे. तालुक्यातील शिक्षकांनी अखिल संघाला हाक द्यावी. शिक्षक संघ अन्यायग्रस्त शिक्षकाच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असे आश्वासन एकनाथ जानकर यांनी दिले. म.ल.देसाई, प्रशांत पारकर, के.टी.चव्हाण, बाबाजी झेंडे, राजा कविटकर यांनी आपल्या मनोगते व्यक्त केली.

दिपेश परब यांनी प्रास्ताविक, झिलू गोसावी यांनी स्वागत, कर्पुरगौर जाधव यांनी सूत्रसंचालन तर विलास गोसावी यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page