इन्सुली-वेत्ये सीमेवरील क्वारीमुळे घरांसह शेतीचे नुकसान

क्वारी तात्काळ बंद करावी; कोठवळेबांध ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बांदा : प्रतिनिधी इन्सुली वेत्ये सीमेवर वेत्ये गावात सहस्त्रा इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीच्या वतीने रात्रंदिवस बोअर ब्लास्टिंग करून मोठ्या प्रमाणत दगड उत्खनन सुरु आहे. त्यामुळे आमच्या घरांच्या भिंतींना भेगा, धुळीमुळे शेतीचे नुकसान, मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ब्लास्टिंग मुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. वारंवार होणारे नुकसान पाहता आपण सदरची क्वारी तात्काळ बंद करावी तसेच झालेले आमचे नुकसान आम्हांला मिळवून द्यावे. सदरची क्वारी बंद न झाल्यास आम्ही कायदा हातात घेऊन क्वारी बंद करू दरम्यान कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास शासन जबाबदार राहील असे लेखी निवेदन अजय कोठावळे व कोठवळेबांध ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना दिले आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले कि, काळा दगड उत्खननामुळे आमच्या झालेल्या नुकसानीची दोन वर्षा पूर्वी शासनाने पाहणी केली. परंतु त्याची नुकसान भरपाई आम्हांला।अद्याप मिळाली नाही. आपल्या कडून।सहस्त्र इन्फ्रा या कंपनीला झुकते माप दिले जात आहे. त्यामुळे सदर कंपनीचे अधिकारी व कर्मचारी मुजोर झालेत.परिणामी तीव्र क्षमतेचे बोअर ब्लास्टिंग करून परवानगी दिलेल्या पेक्षा अधिक पटीने दगड उत्खनन करतात. त्यामुळे आमच्या शेती, बागायतीचे, नैसर्गिक साधन संपत्तीचे नुकसान करून लाखो रुपयाचा महसूल ते बुडवित आहेत.

वेळोवेळी आपणास सदर प्रकरणी विनंती करूनही आपलेकडून दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आम्हांला आता कायदा हातात घेऊन क्वारी बंद करणे भाग पडणार आहे.त्याला सर्वस्वी आपण जबाबदार रहाल असे लेखी निवेदन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, उपविभागीय अधिकारी सावंतवाडी व तहसीलदार सावंतवाडीत यांना दिले आहे. यावेळी अजय कोठावळे, सुबोध कोठावळे, नंदकिशोर कोठावळे, शरद कोठावळे, सीताराम कोठावळे, कृष्णाजी कोठावळे, सचिन वारंग, रामदास जयवंत केरकर, सुरेंद्र कोठावळे, सर्वेश कोठावळे आदीसह कोठावळेबांध ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे

You cannot copy content of this page