बांदा ता.२१-:* सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचा भव्य जिल्हा स्नेह मेळावा रविवार २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथे होणार आहे.
या मेळाव्यास प्रमुख पाहूणे गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत व महाराष्ट्र माध्यमिक संघ (फेडरेशन)चे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे, आरवली सोन्सुली संस्थेचे क्षेत्राधिकारी शिवचैतन्य आजोबा महाराज, कोल्हापुर अध्यक्ष बि.डी.पाटील, रत्नागिरी अध्यक्ष सागर पाटील आदी मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत. तरी या मेळाव्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ अध्यक्ष लक्ष्मण पावसकर व सचिव पांडुरंग काळे यांनी केले आहे.
