जुगारावर छापा टाकून २० जण ताब्यात
*⚡कणकवली ता.२०-:* जुगाराविरोधात कणकवली पोलिसांनी जोरदार मोहीम राबविली आहे.कणकवलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी टाकली असून १ लाख २४ हजार रोख तर १२ दुचाकी एक रिक्षा, एक ईरटीका, एक इको असा मुद्देमाल जप्त केला.तर 20 जणांना अटक करण्यात आली आहे.तर काही गाड्यांचे मालक सापडले नसल्याने अजून आरोपी वाढण्याची शक्यता आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास कणकवली नागवे करंजे हद्दीजवळील नदीच्या किनारी हा जुगार चालू होता.ताब्यात घेण्यात आलेल्यामध्ये कणकवलीसह कुडाळ मालवण मधील काहींचा समावेश आहे . विशेष म्हणजे पोलिसांनी गनिमी काव्याचा वापर करत रस्त्यावर ठेवण्यात आलेल्या खबऱ्यांना कोणतीही कल्पना लागू न देता ही मोठी कारवाई केली आहे .बुधवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास कणकवली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.
कणकवली शहरात निमेवाडी उचवळे नदीकिनारी जुगाराचा मोठा पट बसला असेल याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच या पथकाने हा छापा टाकला. कणकवली शहरात खुलेआम जुगार, मटका सुरू असताना पोलिसांकडून कारवाई होत नसल्याच्या तक्रारी वरिष्ठ स्थळापर्यंत प्राप्त झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नियोजनबद्धरीत्या छापा टाकला. या छाप्यात रात्रीच्या काळोखात पळताना काही जणांना पडून किरकोळ दुखापतही झाल्याची चर्चा आहे. यात जयवंत आत्माराम बाईत , (वय ४७ वर्ष , रा . कणकवली तेली आळी, ता . कणकवली , जि . सिंधुदुर्ग ),रविंद्र तुकाराम बाणे , वय ५२ वर्षे रा . आशिये बाणेवाडी ता . कणकवली , जि . सिंधुदुर्ग ) सिध्देश अरविंद बांदेकर , (वय ३८ वर्षे , रा . कणकवली परबवाडी , ता . कणकवली , जि . सिंधुदुर्ग ), महादेव सूर्यकांत कुपेरकर , (वय ३३ वर्षे , रा आवळेगाव कुंभारवाडी , ता . कुडाळ , जि . सिंधुदुर्ग ) संदीप लक्ष्मण पाताडे (वय ४६ वर्षे , रा . कणकवली तेलीआळी , ता . कणकवली , जि . सिंधुदुर्ग ), राजु शिवराम जमादार (वय ४० वर्षे , रा . कणकवली टेबवाडी , ता . कणकवली , जि . सिंधुदुर्ग) , चेतन सिताराम जामसंडेकर , (वय २७ वर्षे रा . सर्जेकोट , ता . मालवण , जि . सिंधुदुर्ग ), प्रविण विठ्ठल आरोलकर , (वय ५४ वर्षे , रा . वागदे सावरवाडी , ता कणकवली जि . सिंधुदुर्ग ) विलीन मंगेश बांदेकर ,( वय ३० वर्षे , रा . देवबाग मोबार , ता . मालवण , जि . सिंधुदुर्ग ), .यशवंत विष्णु देसाई (वय ३७ वर्षे , रा . कणकवली म्हाडगुत कॉम्प्लेक्स , ता . कणकवली ), निलेश मनोहर हेरेकर ( वय ४२ वर्षे , रा . कणकवली शिवाजीनगर , ता . कणकवली , जि . सिंधुदुर्ग) संदीप रामचंद्र राणे , वय ४६ वर्षे , (रा . कणकवली परबवाडी , ता . कणकवली , जि . सिंधुदुर्ग ), जयन राजेंद्र सुतार ,( वय २ ९ वर्षे , रा . कणकवली कांबळेगल्ली , ता . कणकवली , जि . सिंधुदुर्ग ), प्रदीप राजेंद्र शिर्सेकर , (वय ३८ वर्षे , रा . मालवण धुरीवाडा , ता . मालवण , जि . सिंधुदुर्ग ), संकेत अरविंद बांदेकर ,( वय ३२ वर्षे , रा . कणकवली परबवाडी , ता . कणकवली , जि . सिंधुदुर्ग) , मोसीन नुरमहम्मद मुजावर , (वय ३४ वर्षे रा . मालवण मेढा , ता . मालवण जि सिंधुदुर्ग ), राजेंद्र शशिकांत सावंत , (वय ५० वर्षे , रा . आवळेगाव देऊळवाडी , ता . कुडाळ , जि . सिंधुदुर्ग ), नदीम नुरमहम्मद मुजावर ,( वय ३६ वर्षे , रा . मालवण मेढा , ता . मालवण , जि . सिंधुदुर्ग) , संतोष बाळकृष्ण चव्हाण ,( वय ४७ वर्षे , रा . कडावल सुवेवाडी , ता . कुडाळ , जि . सिंधुदुर्ग ), रमेश रामचंद्र येरागी , (वय ४६ वर्षे , रा . देवबाग मोबार , ता . मालवण , जि . सिंधुदुर्ग )यांचा समावेश आहे. ही कारवाई कणकवली पोलिसांनी गनिमी माध्यमातून पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या नेतृत्वाखाली केली.पोलीस उप निरीक्षक बापू खरात यांनी योग्य नियोजन करून ही धाड टाकली. या पथकात हेडकॉन्स्टेबल दाजी सावंत, हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत झोरे ,पोलीस नाईक पांढरे ,पोलीस कॉन्स्टेबल रुपेश गुरव ,पोलीस कॉन्स्टेबल मनोज गुरव ,पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथे, पोलीस कॉन्स्टेबल कैलास इंफाळ, चालक पोलीस कॉन्स्टेबल किरण कदम ,पोलीस नाईक चंद्रकांत माने यांनी ही कारवाई केली.
