शांतता कमिटीची फेररचना करा

माजी नागराध्यक्ष बबन साळगावकर यांची मागणी

*⚡सावंतवाडी ता.२०-:* शांतता कमिटीची नुकतीच झालेली बैठक पुन्हा बोलवावी. तसेच प्रतिष्ठित व्यक्ती शांतता समितीमध्ये असावेत. त्यामुळे कमिटीची फेररचना करण्यात यावी. शहरात सामाजिक सलोखा, शांतता कायम राहील यासाठी पोलिसांनी प्रयत्नशील राहावे, अशी मागणी असे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्याची शांतता समितीची बैठक बोलावून फक्त औपचारिकता साधली जाऊ नये.असे माजी नगराध्यक्ष साळगावकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे शांतता समितीची बैठक पुन्हा बोलवा आणि शांतता समितीची फेररचना करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. साळगावकर म्हणाले, सावंतवाडी पोलीस स्टेशन शांतता कमिटीची बैठक पुन्हा बोलवावी. अचानक, आयत्यावेळी फोन लावून शांतता कमिटीची बैठक बोलवणे अत्यंत चुकीचे आहे. देश आणि महाराष्ट्रातील सध्याची स्थिती, राजकारण पाहता सर्वांनी सामाजिक सलोखा राखणे आवश्यक आहे.

You cannot copy content of this page