भाजप पुरस्कृत स्वराज्य विकास पॅनलचा एकतर्फी विजय : सर्व १३ जागा ताब्यात
*⚡मालवण ता.१८-:* मालवण तालुक्यातील लक्षवेधी अश्या हिवाळे, ओवळीये, शिरवंडे विविध कार्यकारी सोसायटीवर भाजप पुरस्कृत स्वराज्य विकास पॅनलने विजय मिळवला. विरोधकांची धूळधाण उडवत सर्व १३ जागांवर एकतर्फी विजय मिळवला आहे.
भाजप नेते प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पंचायत समिती माजी गटनेते सुनील घाडीगांवकर यांच्यासह महेंद्र चव्हाण, विभाग अध्यक्ष प्रशांत सावंत, दादा परब, विश्वास परब, रघु गावकर, नयन कुलकर्णी, समीर सावंत, शंकर धुरी, तुषार हाटले, बबन परब, पांडुरंग धुरी, रमेश धुरी, विजय पवार, संतोष कदम, सुभाष सावंत, जनार्दन पळसंबकर यासह अन्य ग्रामस्थ, शेतकरी, मतदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मिळालेला हा विजय जनतेचा, शेतकऱ्यांचा, मतदारांचा असल्याची भावना सुनील घाडीगांवकर यांनी व्यक्त केली आहे. या निवडणूकीत नंदकुमार मनोहर आंगणे, सुरेश श्रीधर गावकर, रघुनाथ सीताराम गावडे, संजय बाळकृष्ण घाडीगांवकर, विजय काशीराम खांडेकर, मंगेश गिरीधर लुडबे, दीपक शंकर पवार, श्रीकांत वासुदेव सावंत, पार्वती दत्ताराम धुरी, शिला संतोष निर्गुण, सत्यवान रामचंद्र जंगम, भगवान बाब्या जंगले, रामचंद्र सखाराम ओवळीयेकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.
