सावंतवाडी ता.१८-:हातभार चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग यांच्या सौजन्याने म्हाळाईवाडी महिला मंडळ तळवडे यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे आरोग्य शिबिर म्हाळाईवाडी येथील आरोग्य केंद्रात शुक्रवार दिनांक 22 एप्रिल रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. यावेळी नेत्र तपासणी नंतर ज्यांना चष्म्याची आवश्यकता आहे त्यांना 50 टक्के सवलतीच्या दरात देण्यात येणार आहेत. तसेच ज्यांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया आवश्यक आहे.
त्यांची मोफत मोती बिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या शिबिराचा लाभ सर्व गरजूनी घ्यावा असे आवाहन हातभार चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग आणि म्हाळाईवाडी महिला मंडळ यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी हातभार चॅरिटेबल ट्रस्ट जिल्हाध्यक्ष सुभाष साबळे 7875837568, संस्थापक सचिव 9404396029 आणि म्हाळाईवाडी महिला मंडळाच्या प्रांजल आचरेकर 9405174462 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
