सोबत येतील त्यांना एकत्र घेऊन सिंधुदुर्गातील निवडणुकीत विजय मिळवा – वर्षा गायकवाड

मालवण ता.१८-:* राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव काका कुडाळकर व सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसचे माजी प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी भेट घेत चर्चा केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेस असे दोन पक्षाचे पदाधिकारी एकत्र येऊन जिल्ह्यातील प्रश्नांना न्याय मिळवून देत असाल तसेच भविष्यात आपल्या सोबत अजून कोणी येणार असतील तर त्यांनाही एकत्र घ्या, आणि जिल्ह्यातील येत्या निवडणुकांमध्ये विजय मिळवा अशा सूचना यावेळी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्याची माहिती अरविंद मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण बाधित होऊ नये यासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या विभागातर्फे विविध उपाययोजना केल्या आहेत. सवलतीचे क्रीडा गुण इंटरमिजिएटचा आधार घेऊन देण्यात येणार असल्याने मुलांनाही त्याचा आधार मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अश्या योग्य निर्णयासाठी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यासाठी युवक काँग्रेसचे माजी जिल्हा प्रवक्ता अरविंद मोंडकर यांनी शिक्षणमंत्री गायकवाड यांची मुंबई येथे त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत मोंडकर यांनी शिक्षण मंत्र्यांशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक विषयावर चर्चा केली. या भेटीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव काका कुडाळकर देखील उपस्थित होते. काका कुडाळकर यांनी देखील जिल्ह्यातील काही विषयावर चर्चा केली. कुडाळ प्रमाणे येणाऱ्या मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी निवडणूका मध्ये देखील आपला नगराध्यक्ष बसवण्यासाठी प्रयत्न करा व त्यासाठी आपण देखील जिल्ह्यात भेट देऊ आणि समन्वयात सहभागी होऊ असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. यावेळी मुंबई काँग्रेसच्या वडाळा येथील नगरसेविका पल्लवी मुणगेकर यांचे पती मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी महेंद्र मुणगेकर देखील उपस्थित होते, अशी माहिती अरविंद मोंडकर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page