कळणे खान फुटून झालेली नुकसानी वर्ष उलटले तरी नाही;अभय देसाई यांचा इशारा
दोडामार्ग ता.१७-:* कळणे खाण कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे कळणे खाण फूटून कोट्यावधी रूपये नुकसान झाले ही मानव निर्मित घटना होती शासनाने नुकसानीचे पंचनामे सादर करुन वर्षे उलटले तरी प्रशासन कळणे खाण कंपनी यांनी नुकसान भरपाई दिली नाही.उलट प्रशासनाने कळणे खाणीत काम सुरु करायला लावले .खनिज वाहतुक सुरु केली .पण खरोखरोच देशोधडीला लागलेला शेतकरी अनेक आंदोलन करून देखील भरपाई पासून वंचित आहे. त्यामुळे येत्या २९ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे तिरडी आंदोलन करणार असा इशारा अभय पांडूरंग देसाई यांनी एका लेखी निवेदनाध्दारे दिला आहे. झालेल्या फसवणूक प्रकरणी हे आंदोलन आहे असे सांगितले.
