पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरिक्षक शेखर माने यांची पत्रकार परिषदेत माहिती..
सावंतवाडी ता.१८-: राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा सुरू असून, येत्या 23 एप्रिल रोजी कोल्हापूर येथे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत लाखो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या यात्रेचा समारोप कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादीीी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक शेखर माने यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अमित सामंत, सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष अर्चना घरी परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, प्रफुल सुद्रिक काका कुडाळकर, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर,आदी उपस्थित होते.
