*⚡सावंतवाडी ता.१८-:* भाजपच्या प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आशिष नाबर यांनी राष्ट्रवादीचे सावंतवाडी पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष अर्चना घारे, जिल्हा प्रवक्ते काका कुडाळकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सुरेश गवस आदी पदाधिकारी उपस्थित होते.
