विद्युत शॉक लागलेल्या माकडाला जीवदान

भटवाडी परिसरात सकाळी घडली होती घटना;जखमी माकडाला पशु दवाखान्यात नेत केले उपचार

सावंतवाडी ता.१८-:* विद्युतभारीत तारेचा शॉक लागून बेशुद्ध पडलेल्या माकडाला सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी जीवदान दिले ही घटना आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास भटवाडी परिसरात घडली त्या माकडाला पशु रुग्णालयात दाखल करून त्यावरील उपचार केल्यानंतर त्या माकडाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

संबंधित माकड शॉक लागून उंचावरून खाली पडल्यामुळे जखमी झाला होता त्याच्या नाका तोंडातून रक्तस्राव होत होता दरम्यान याबाबत वि. स. खांडेकर महाविद्यालयचे मुख्याध्यापक राजाराम पवार यांना हे दृश्य दिसून येताच त्यांनी सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव यांना याबाबत माहिती दिली त्यानुसार श्री. जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत त्या माकडाला उपचारासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे स्वाधीन केले उपचारानंतर संबंधित माकड शुद्धीवर आल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले यावेळी वनविभागाचे अधिकारी प्रमोद सावंत, दीपक भराडी, आदींनी माकडाचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न केले

You cannot copy content of this page